Pimpri Corona Update: रुग्णवाढ कायम! शहरात आज नवीन 3 हजार 505 रुग्णांची नोंद; 2 हजार 64 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 3 हजार 505 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 2 हजार 64 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 532 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 9 हजार 23 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 19 हजार 56 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 18 हजार 528 रुग्ण गृहविलगीकरणात असून 528 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 118 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 650 आहेत. आज दिवसभरात 9 हजार 211 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 31 लाख 94 हजार 758 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.