Pune Corona Update : शहरात कोरोना रुग्णांचा आलेख चढताच; दिवसभरात 9 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमालीची वाढताना दिसत आहे. शहराच्या विविध भागातील 6 हजार 441 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 4 हजार 857 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

कोरोनामुळे शहरातील नऊ रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 9 हजार 161 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 5 लाख 76 हजार 269 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 39 हजार 582 सक्रिय रुग्ण शहरात आहेत, यामध्ये आज दिवसभरात 6 हजार 441 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली.

तर, शहरात आज दिवसभरात 22 हजार 183 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आजपर्यंत 41 लाख 59 हजार 425 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख चढताच पाहायला मिळतो आहे त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.