Pimpri News: महापालिका तीन नव्हे सहा फायर बाईक खरेदी करणार; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – शहरातील अरुंद गल्लीबोळात आणि झोपडपट्यांतील आग विझविण्यासाठी एका बाईकची 13 लाख 48 हजार रुपये किंमत असलेल्या सहा फायर फायटिंग मोटार बाईक खरेदी करण्यात येणार आहेत. महापालिका कार्यक्षेत्रातील प्रत्यक्षात कार्यरत सहा अग्निशामक केंद्रे, महापालिकेचे भौगोलिक क्षेत्र विचारात घेता तीनऐवजी सहा बाईक खरेदी करण्यास स्थायी समितीने उपसूचनेद्वारे मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात जिथे आगीचे बंब पोहचू शकत नाही अशा अरुंद गल्लीबोळात आणि झोपडपट्यांतील आग विझविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका तीन फायर फायटिंग मोटार बाईक खरेदी करणार होती. अशा प्रकारची वाहने उत्पादीत करणारी एकमेव कंपनी आरएमएस फायर सेफ्टी सर्व्हिसेस (इं) प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून गव्हरमेंट ई मार्केट दराने (Gem) निविदा न मागविता, करारनामा न करता थेट पद्धतीने महापालिका फायर फायटिंग मोटार बाईक खरेदी केली जाणार आहे. एका बाईकची किंमत 13 लाख 48 हजार रुपये आहे. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला होता.

स्थायी समितीने बाईकमध्ये वाढ केली. तीनऐवजी सहा फायर फायटिंग मोटार बाईक खरेदी करण्याची उपसूचना मंजूर केली. पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील प्रत्यक्षात कार्यरत सहा अग्निशामक केंद्रे, महापालिकेचे भौगोलिक क्षेत्र विचारात घेता तीनऐवजी तीन वाढीव मोटार बाईक खरेदी कराव्यात, अशी उपसूचना स्थायी समितीने मंजुर केली. आरएमएस फायर सेफ्टी सर्व्हिसेस (इं) या कंपनीकडून थेटपद्धतीने सहा बाईक खरेदी केल्या जाणार असून त्यासाठी 80 लाख 88 हजार रुपये खर्च येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.