Kiwale News : सिंबायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ गुरुवारी

एमपीसी न्यूज – पुणे येथील सिंबायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाचा द्वितीय पदवीदान समारंभ गुरुवारी (दि.20) ऑनलाईन आणि ऑफलाईन असा मिश्र स्वरूपात संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य उद्धव ठाकरे हे या दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी असणार आहेत.

सिंबायोसिस संस्थेचे अध्यक्ष आणि कुलपती डॉ. एस. बी मुजुमदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. दिक्षांत समारंभात 395 विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रमाणपत्रे देण्यात येतील तर 2/0मानाचे कुलपती सुवर्ण पदके आणि विविध विद्या शाखेत प्रथम क्रमांक भूषविणाऱ्या 8 विद्यार्थ्यांना आदित्य ठाकरे यांच्या वतीने डॉ. एस. बी मुजुमदार सुवर्ण पदके प्रदान करतील.

तसेच या कार्यक्रमात 2 ‘आत्मनिर्भर पुरस्कार’ आणि २ ‘कुशल पुरस्कार’ जाहीर केले जातील. आत्मनिर्भर पुरस्कार हे विद्यापीठाच्या 2 माजी विद्यार्थ्यांनी ज्यांनी स्वतः चे व्यवसाय सुरु करून इतरांना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या तर ‘कुशल पुरस्कार’ हे विद्यापीठाच्या 2 कौशल्य अभ्यासक्रमाच्या पदविकेच्या विद्यार्थ्यांना ज्यांनी स्वतःचे व्यवसाय चालू केले किंवा प्रतिष्ठित कंपन्यात नोकरी करीत आहेत त्यांना प्रदान करण्यात येतील.

सिंबायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठात तीन हजार पेक्षा जास्त विदयार्थी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, डेटा सायन्स, स्थापत्य, ब्युटी वेलनेस या विभागस्तरीय अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.