Pimpri corona Update : शहरात आज कोरोनाचे 900 रुग्ण, 619 जणांना डिस्चार्ज, 26 मृत्यू

शहरात आजपर्यंत 42 हजार 517 जणांना कोरोनाची लागण झाली.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 869 आणि पालिका हद्दीबाहेरील 31 अशा 900 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 42 हजार 517 झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 618 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 17 आणि शहराबाहेरील पण पालिका रुग्णालयात उपचार घेणा-या 9 अशा 26 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्यामध्ये चिखलीतील 63 वर्षीय पुरुष, दापोडीतील 51 वर्षीय महिला, पिंपरी संत तुकारामनगर येथील 58 वर्षीय पुरुष, चिंचवडगांवातील 62 वर्षीय महिला, भोसरीतील 70, 57, 70, 61 वर्षीय चार पुरुष, रावेत येथील 62 वर्षीय पुरुष, वाकड येथील 73 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 58 वर्षीय पुरुष, नेहरुनगर येथील 74 वर्षीय वृद्ध, बिजलीनगर येथील 49 वर्षीय पुरुष, खराळवाडीतील 33 वर्षाचा युवक, अजमेरातील 85 वर्षीय वृद्ध, शाहूनगर येथील 55 वर्षीय पुरुष, निगडीतील 76 वर्षीय महिला, च-होलीतील 80 वर्षीय वृद्ध महिला, देहुरोड मधील 58, 53 वर्षीय दोन पुरुष, जुन्नर येथील 70 वर्षीय पुरुष, दौंड येथील 55 वर्षीय पुरुष, लोणावळ्यातील 63 वर्षीय पुरुष, कर्वेनगरमधील 83 वर्षीय वृद्ध, तळेगांव येथील 61 वर्षीय पुरुष आणि देहुगांव येथील 19 वर्षीय मुलीचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 42 हजार 517 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 28 हजार 575 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 794 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 166 अशा 960 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 6727 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.