Pimpri Corona Update : शहरात आज 105 नवीन रुग्णांची नोंद, 161 जणांना डिस्चार्ज, 4 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 102 आणि महापालिका हद्दीबाहेरील 3 अशा 105 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 161 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील तीन आणि महापालिका हद्दीबाहेरील एक अशा चार रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चिंचवड येथील 60 वर्षीय पुरुष, चिखलीतील 71 वर्षीय वृद्ध महिला, च-होलीतील 58 वर्षीय महिला आणि मंचर येथील 45 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज मृत्यू झाला.

शहरात आजपर्यंत 1 लाख 1111 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 97 हजार 515 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1825 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 768 अशा 2593 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 620 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 321 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 1 हजार 182 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 637 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.