Pimpri corona Update: शहरात आज 84 नवीन रुग्णांची नोंद, 74 जणांना डिस्चार्ज, 3 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 84 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 74 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात 791 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आजपर्यंत 2595 जणांनी लस घेतली आहे.

शहरातील दोन आणि महापालिका हद्दीबाहेरील एक अशा तीन जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये काळेवाडीतील 65 वर्षीय पुरुष, चिंचवड येथील 74 वर्षीय पुरुष आणि देहूरोड येथील 41 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 99 हजार 738 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 96 हजार 99 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1796 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 757 अशा 2553 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 600 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 882 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.