Pimpri News: शहरातील 5 वी ते 8 वीचे वर्ग 4 फेब्रुवारीपासून सुरू होणार; पालकांचे समंतीपत्रक आवश्यक

एमपीसी न्यूज – नववी ते बारावीचे वर्ग सुरुळीत सुरु झाल्यानंतर आता 5 ते 8 वीचे वर्ग सुरु होणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका ( Municipal), खासगी ( Private) अशा 5 वी ते 8 वीच्या 659 शाळांची ( school) घंटा 4 फेब्रुवारीपासून वाजणार आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी पालकांचे समंतीपत्रक (Parental consent )आवश्यक आहे. याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर ( Commissioner Shravan Hardikar) यांनी काढले.

राज्य शासनाने इयत्ता 5 ते 8 वीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा 4 फेब्रुवारीपासून सुरु केल्या जाणार आहेत.

महापालिका आणि खासगी मि‌‌ळून एकूण 659 शाळा आहेत. यामध्ये 1 लाख 32 हजार 438 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खासगी आणि महापालिकेचे जवळपास तीन हजार शिक्षक आहेत.

शाळ सुरु करण्याच्या अनुषंगाने पूर्व तयारीसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी बुधवारपासून शाळेत हजर रहायचे आहे. शाळांचे निर्जुंतीकरण, स्वच्छता करायची आहे. कोरोनाच्या नियमांचे तंतोतत पालन केले जाणार आहे. शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी थर्मल स्कॅनर, गण, ऑक्सीमीटर, साबण, पाणी या आवश्यक वस्तुंची उपलब्धता शाळा प्रशासनाने करावी.

शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची कोविड आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनाने अतिरिक्त वैद्यकीय अधिका-यांना सादर करणे आवश्यक राहील.

वर्गखोली, स्टाफरुममधील बैठक व्यवस्था शारीरिक नियमानुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एकच विद्यार्थी या प्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी. शाळेत दर्शनी भागात मास्कचा वापरासह इत्यादी मार्गदर्शक सूचना असणारे फलक लावावेत. रांगेत उभे राहण्याकरिता किमान 6 फुट इतके शारीरिक अंतर राखले जाईल याकरिता विशिष्ट चिन्हे लावावीत.

विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करुन शिक्षण विभागाला सादर करावी. शाळेचा परिसर दररोज स्वच्छ करणे, स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे. त्याची तपासणी करण्याची जबाबदारी पर्यवेक्षकांची राहील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळा वाहतुकीच्या वाहनांचे दिवसातून दोनवेळा निर्जंतुकीकरण करावे.

वर्ग बंद खोल्यात भरवण्यात येवू नयेत. हवा खेळती राहण्यासाठी वर्ग खोल्यांची दारे, खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. हवाखेळती नसलेल्या खोल्यांमध्ये वर्ग भरविण्यात येवू नयेत. शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व पूर्तता झाल्याचा अहवाल शिक्षण विभागाच्या अधिका-यांनी खात्री करावी. तसा अहवाल आयुक्तांना पाठवावे असे परिपत्रकात स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.