Pimpri corona Update : शहरात आज 95 नवीन रुग्णांची नोंद, 61 जणांना डिस्चार्ज, आठ मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 95 नवीन कोरोना रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 89 हजार 788 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 61 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

शहरातील पाच आणि पालिका हद्दीबाहेरील तीन अशा आठ जणांचा आज मृत्यू झाला. त्यामध्ये चिंचवड येथील 70 वर्षीय वृद्ध, रावेत मधील 69 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 70 वर्षीय वृद्ध, भोसरीतील 62 वर्षीय पुरुष, यमुनानगर येथील 63 वर्षीय पुरुष आणि नारायणगाव येथील 65 वर्षीय पुरुष, कोथरुड येथील वर्षीय पुरुष, चाकण येथील 55 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 89 हजार 788 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 86 हजार 678 जण बरे होऊन घरी गेले. शहरातील 1569 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 651 अशा 2220 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 621 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1006 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.