Pimpri corona Update : शहरात आज 1485 नवीन रुग्णांची नोंद, 1315 कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1472 आणि महापालिका हद्दीबाहेरील 13 अशा 1485 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1315 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील चार आणि महापालिका हद्दीबाहेरील दोन अशा सहा जणांचा आज मृत्यू झाला आहे.

त्यात पिंपरीतील 65 वर्षीय पुरुष, चिखलीतील 35 वर्षाचा युवक, मोशीतील 48 वर्षीय पुरुष, पिंपळेसौदागर येथील 62 वर्षीय पुरुष, खडकीतील 44 वर्षीय पुरुष, मुंढवा येथील 53 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 36 हजार 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 17 हजार 492 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1977 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 832 अशा 2809 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 2816 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 2965 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 1 लाख 27 हजार 238 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 3553 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.