Pimpri: कोरोनाचे रुग्ण सापडल्याने ‘हा’ परिसर केला ‘सील’

Corona's patient found, 'sealed' This Area

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. आज (सोमवारी) शहरातील 20 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने काही भाग सील केला आहे.

शहरातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडतील तो भाग महापालिकेकडून तत्काळ सील केला जातो. तसेच त्या परिसरातील हालचालींवर बंधने आणली जातात.

आनंदनगर, दापोडी, भारतनगर पिंपरी, मोरवाडी, दत्तनगर, थेरगाव, पाटीलनगर, चिखली, भाटनगर, वडमुखवाडीत आज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.

त्यामुळे रेणुका अपार्टमेंट-दळवीनगर, विजयनगर-काळेवाडी, बालाजीनगर-भोसरी, साई श्रद्धा अपार्टमेंट – खराळवाडी सोनकर कॉम्पलेक्स पिंपरी, कमलाकर चौक-वाकड, शिवतीर्थनगर -रहाटणी, वडमुखवाडी-भोसरी हा परिसर आज रात्री 11 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे.

या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.