Pimpri : महापालिकेच्या शाळांमध्ये हस्ताक्षर प्रकल्प सुरु करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये 2006 पासून हस्ताक्षर प्रकल्प बंद करण्यात आला आहे. हा प्रकल्प सुरु करण्याची मागणी पिंपरी विधानसभा संघटिका सरीता साने आणि उपसंघटिका शैला पाचपुते यांनी महापौर राहूल जाधव यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, हस्ताक्षर प्रकल्प पिंपरी-चिंचवड शाळांमध्ये 2006 पासून राबविण्यात येत आहे.मागील वर्षी हस्ताक्षर प्रकल्प बंद करण्यात आला आहे.7 शिक्षिका हस्ताक्षर प्रकल्पासाठी मानधनावरती काम करत होत्या.

  • सर्व मुलांची व शिक्षकांची हस्ताक्षर सुधार प्रकल्प राबविण्यात आल्याने अक्षरात आमुलाग्र बदल घडून आला होता. पण, काही कारणास्तव हा प्रकल्प बंद पडला. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हस्ताक्षर प्रकल्प सुरु करावा, असेही निवेदनांत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.