Pimpri : रोटरीच्या माध्यमातून कापडी पिशव्यांचे घरोघरी वाटप

एमपीसी न्यूज : रोटरीच्या (Pimpri) माध्यमातून चालू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ 1 लाख कापडी पिशवी अभियान अंतर्गत आज वाल्हेकरवाडी येथील कुटे सुखवास्तू सोसायटीच्या सदस्यांनी सहभाग घेत मकरसंक्रातीच्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने वाण म्ह्णून कापडी पिशवी वाटप केले.

प्रोजेक्ट धरित्री हे महिला सबलीकरण आणि पर्यावरण रक्षण या उद्देशाने सुरु केलेला रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांचा उपक्रम आई. याद्वारे 1 लाख कापडी बॅग अभियान हा सिनर्जी प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे. कूटे सुखवास्तू सोसायटीमध्ये प्रोजेक्ट यशस्वी करण्यास रोटरीयन रामेश्वर पवार, तसेच सोसायटी चेयरमन मनोज तिडके, सचिव पवार रामेश्वर, खजिनदार शरद देठे, लावंड शरद, अनिल जाधव, राहुल शिंदे, पिंटू चौधर, कदम साहेब इतर सोसायटीतील पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. सर्व सदस्यांनी हा पर्यावरण पूरक हळदी कुंकू कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला.

Mulshi : दोन गावात झाली चोरी; बाइकसोबत चार्जरही चोरीला

सोसायटी धारकांनी एकमेकांना संक्रातीच्या (Pimpri) शुभेच्या देत प्लास्टिक पिशवी वापर बंद करण्याचा संकल्प केला. रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे गव्हर्नर डॉ. अनिल परमार ह्यांच्या मार्गदर्शनात चालू असलेल्या या प्रोजेक्टमध्ये शहरातील विविध रोटरी क्लब सामाजिक संस्था, सोसायटी, शाळा यांनी सहभाग घ्यावा आणि पर्यावरण रक्षणास सहाय्य करावे, असे आवाहन टीम रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने प्रेसिडेंट गणेश बोरा आणि संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांच्या कडून करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.