Pimpri : मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची 110 व्या जयंतीनिमित्त थेरगाव येथे तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे, संघटक ज्ञानेश्वर लोहे, विजय घाडगे, बळीराम माने, तेजस पाटील, विनोद साळुंखे, सत्यवान काशिद, संजय जगताप, संतोष माळी, सुहास बालगुडे आदी उपस्थित होते .

  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसिद्धीचे काम आजही अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ द्वारे केली जाते, असे विचार गणेश दहिभाते यांनी मांडले.

कार्यक्रमाचे आयोजन रविकांत जाधव लक्ष्मण पवार, संतोष होले, परमेश्वर शेळके, नीलेश खैरे यांनी केले होते. कार्यक्रमाचे आभार मल्हारी पाटील यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.