Pimpri : भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन गुरुवारी पुणे, पिंपरी चिंचवडसह देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय यांच्यासहित, शाळा, महाविद्यालयांमधून ध्वजारोहण करण्यात आले.

पुण्यात विधानभवन येथे राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार अमर साबळे, गिरीश बापट आदी उपस्थित होते. पिंपरी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर राहुल जाधव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, नगरसदस्य राजेंद्र गावडे, केशव घोळवे, नामदेव ढाके, अमित गावडे, राजू मिसाळ, स्विकृत नगरसदस्य भाऊसाहेब भोईर, प्रेमकुमार नायर, माऊली थोरात, नगरसदस्या सुजाता पालांडे, अनुराधा गोरखे, मीनल यादव, शैलजा मोरे, प्रभाग समिती नामनिर्देशित सदस्य संदीप खाडे, विठ्ठल भोईर, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसदस्य गोविंद पानसरे, विजय लांडे, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य लेखा परीक्षक अमोद कुंभोसकर, मुख्य लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अति. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त आशा दुरगुडे, मनोज लोणकर, चंद्रकांत इंदलकर, अण्णा बोदडे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंदारे, प्रमोद ओंबासे, प्रविण घोडे, देवन्ना गट्टुवार, प्रवीण तुपे, संजय खाबडे यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक, आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर्न कमांड येथील नॅशनल वॉर मेमोरियल येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सदर्न कमांडचे वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना पुष्पचक्र वाहून आदरांजली देण्यात आली. शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हे वॉर मेमोरियल नागरिकांसाठी दिवसभर खुले ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे वॉर मेमोरियल पासून पुणे शहरातील काही सामाजिक संस्थांच्या वतीने बाइक रॅली काढण्यात आली. योगायोगाने त्याच दिवशी रक्षाबंधन असल्यामुळे विविध शाळांमधील विद्यार्थिनींनी जवानांना राख्या बांधून त्यांच्याबद्दल आपला आदर व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खराळवाडी येथील कार्यालयात शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी यावेळी महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, पक्ष प्रवक्ते फजल शेख, नगरसेविका अपर्णा डोके, गीता मंचरकर, ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, सेवादल अध्यक्ष आनंदा यादव, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, व्यापारी सेल अध्यक्ष प्रदीप गायकवाड, वकिल सेल अध्यक्ष गोरक्ष लोखंडे, महिला संघटीका कविता खराडे, दीपक साकोरे, महिला कार्याध्यक्ष पुष्पा शेळके, महिला भोसरी विधानसभा अध्यक्षा मनीषा गटकळ, दीपाली देशमुख, विश्रांती पाडाळे, सविता खराडे, सुनंदा काटे, देवी थोरात, अमिना पानसरे, संजय औसरमल, जवाहर इटकल, तुकाराम बजबळकर, दत्तात्रय जगताप, प्रकाश देवाडीकर, ज्ञानेश्वर कांबळे, प्रविण गव्हाणे, महेश झपके, दिलीपराव तापकीर, सुलेमान शेख, शमा गफ्फर, मिना मोहिते, शमा कोरबू, मीना कोरडे, गोरोबा गुजर, शक्रुल्ला पठाण, श्रीमंत जगताप, अंकुश दिघे, राजेंद्र शिंगटे, नवनाथ डफळ, सर्जेराव जगताप, सुभाष हजारे, काळूराम खेडकर, पोपट पडवळ, जगन्नाथ फलफले, सतिश चोरमले, सलीम सय्यद, आनंद बहिरट इत्यादींसह मान्यवरांसह अनेक ‍पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये निवृत्त मेजर प्रतापसिंह भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रो.मॉडर्न फार्मसी कॉलेज निगडीचे प्राचार्य डॉ.प्रवीण चौधरी, निवृत्त सुभेदार भागवत शिंदे ,अमिता किराड, मुख्याध्यापक सतीश गवळी ,राजीव कुटे ,संगीता घुले,तृप्ती वंजारे , गौरी सावंत, पांडुरंग मराडे ,सदाशिव शिरगावे ,रेखा धामणे उपस्थित होते. यावेळी मेजर प्रतापसिंह भोसले यांनी कारगिल युद्धाचे अनेक प्रसंग सांगून , जवानांच्या त्यागाची आणि पराक्रमाची माहिती दिली.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमध्ये उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला . संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी सचिव लतीफ मगदूम ,डॉ अरिफ मेमन , शाहिद इनामदार ,एस ए इनामदार ,हाजी कादिर कुरेशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते . लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी वर आधारित तसेच स्वातंत्र्यवीरांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.

भारतीय जैन संघटना पिंपरी चिंचवड विभाग तर्फे पिंपरी येथील भारतीय जैन संघटना विद्यालय येथे भारताचा 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे संदेश गादिया, विरेश छाजेड, शुभम कटारिया, नयन शाह उपस्थित होते. प्रभारी प्राचार्य कदम सर, उप प्राचार्य कोकणे सर, जाधव सर आणि शिक्षकवृंद यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी समूहगीत, नृत्य आदी कला सादर केली.

तळेगाव दाभाडे येथील माईर्स एम. आय .टी संचलित एम.आय.एम.ई.आर. वैद्यकीय महाविद्यालय येथे 73 वा स्वातंत्र्य दिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. गुणवंत विद्यार्थिनी केतकी ठकेकर हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निवृत्त कर्नल डॉ.राजेंद्र प्रसाद गुप्ता, डॉ. सुरेश घैसास, डॉ. सुचित्रा नागरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सांगली- कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी संस्थेच्या कर्मचारी वर्गाच्या वतीने आर्थिक मदत जाहीर करण्यात आली

ओम प्रतिष्ठान संचलित वंडरलैंड स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ. सलील पाटील, डॉ. पराग पाटील उपस्थित होते. डॉ. सलील पाटील यांनी स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन दिले व सर्व लहान मुलांचे कौतुक केले. डॉ. पराग पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी चिमुकल्यांनी देशभक्तीवर गीत साजरी करून सर्वांची मने जिंकली. मुलांनी गांधीजी, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, भगतसिंग, भारतमाता अशा अनेक वेशभूषेत येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. रवींद्र काळे यांनी घोषणा देऊन वातावरण देशभक्तीपर केले. वनिता सावंत यांनी आभार मानले.

भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवतेजनगर येथील तिरंगा चौकात महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. शिवतेज प्रतिष्ठान, राजे शिवबा युवा मंच, विठ्ठल रुख्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट, शिवतेज मित्र मंडळ आदी संस्थांच्या वतीने परिसरात भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. सर्व वयोगटातील नागरिक स्त्री पुरुष आणि मुले हातात तिरंगी झेंडे घेऊन फेरी मध्ये सहभागी झाले होते. तिरंगी झेंड्याला मानवंदना देण्यात आली. व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी “भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता” या विषयावर उपास्थितांना मार्गदर्शन केले.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका योगिता नागरगोजे, संदिपान मंगवडे, अनिल नेवाळे, बालाजी कानवटे, राजेंद्र कुलकर्णी, चंद्रकांत बावळे, नामदेव निकम, विठ्ठल दळवे, सागर गावडे, दोशी काका आदींची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून खानदेश तेली समाज यांच्या वतीने रावेत येथे बुधवारी वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि विधानसभा निवडणुकीचे प्रबळ दावेदार शेखर ओव्हाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे उपस्थित होते. कार्यक्रमास तेली समाजाचे अध्यक्ष पी. टी. चौधरी, उपाध्यक्ष अनिल चौधरी, माजी अध्यक्ष विशाल चौधरी, सचिव राजेंद्र चौधरी, लिंबा चौधरी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने “तिरंगा सन्मान यात्रेचे “आयोजन करण्यात आले होते. यानिमिताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमिताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला, या सन्मान यात्रेत परिसरातील अनेक आबालवृद्धांनी सहभाग घेतला ,भारत माता की जय, वंदे मातरम या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. भारत माता कि जय,वंदे मातरम असा जयघोष करीत ही सन्मान यात्रा कुणाल आयकॉन रस्ता, शिवार चौक, कोकणे चौक, पिंपळे सौदागर गावठाण, स्वराज गार्डन चौक, गोविंद यशदा चौक मार्गे उन्नती सोशल फौंडेशनच्या कार्यालयाजवळ सांगता झाली.

यावेळी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे, नगरसेवक शत्रुघ्न काटे ,पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, शंकर चौंधे , उद्योजक राजू भिसे ,विकास काटे ,रोहिदास गवारे ,अतुल पाटील ,संकेत कुटे,गोल्डी दत्ता,शरद कुटे यांच्यासह परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील तसेच आनंद हास्य क्लबचे सर्वच सदस्य हजर होते. सागर बिरारी यांनी सूत्रसंचालन केले तर विजय भिसे यांनी आभार मानले

सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडियम स्कूल आणि भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सुनिल तोडकर, स्वाती तोडकर आणि जावेद पिरजादे या पालकांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील, आशा घोरपडे, मधु दाणी यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व नृत्य सादर केली. याबरोबरच ‘आय अ‍ॅम द बेस्ट’ ही नाटिका सादर करीत विद्यार्थ्यांनी वातावरण भारावून टाकले. दहावीतील विद्यार्थी अरमान शेख व ह्रषिकेश थोरात यांनी ‘भारताचा विकास आणि तंत्रज्ञान’ विषयावर भाषण केले. संकर्षण वरेकर या पहिलीतील विद्यार्थ्याने देशभक्तीपर गीत सादर करीत सर्वांना मंत्रमुग्ध केले. गुणवंत विद्यार्थीनी रोहिन पिरजादे व विद्यार्थी ओम दरेकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. अतुल शितोळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन नीलम पवार यांनी, तर रिंकू शिंगवी यांनी आभार मानले.

रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध पुणे येथे ७३ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, पश्चिम विभागीय चेअरमन अँड. राम कांडगे उपस्थित होते. विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, उपविभागीय अधिकारी शंकर पवार, औंधचे स्वीकृत नगरसेवक वसंतराव जुनवणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, उपप्राचार्य डॉ.संजय नगरकर, क्रीडा विभागप्रमुख प्रा.भीमराव पाटील उपस्थित होते. तसेच अँड. राम कांडगे यांच्या हस्ते ‘अक्षररंग’ भित्तीपत्रीकेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच बी.बी.ए. विभागाने तयार केलेल्या ‘रीसेण्ट टेक्नॉलॉजीवर’ आधारित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉ. तानाजी हातेकर, डॉ.सुहास निंबाळकर, डॉ. शशी कराळे, प्रा.नलिनी पाचर्णे, प्रा.सुशीलकुमार गुजर, प्रा.एकनाथ झावरे, डॉ.राजेंद्र रासकर, डॉ.रमेश रणदिवे, प्रा.स्नेहल रेडे, प्रा.किरण कुंभार, प्रा.मयुर माळी याबरोबरच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

पिंगळे गुरव येथे कॅप्टन अण्णासाहेब मोहिते, दिव्यांग मुलगी कांचन गांगुर्डे यांच्या उपस्थित ध्वजारोहण करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सागर अंघोळकर व महेश जगताप, अरूण पवार होते. यावेळी सुरेश कंक यांनी राष्ट्रभक्तीपर गीत सादर केले. श्रुती शेळके, अतुल देशमुख, गुरूप्रसाद सावंत या दिव्यांग मुलाने भक्ती गीत सादर केले .

साहित्य सर्वधन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक, मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आन्ना जोगदंड भैरनाथ जेष्ट संघाचे अध्यक्ष रामचंद्र कदम यांच्या हस्ते दिपस्तंभ संस्थेतील दिव्यांग व शिशू मंदिर मधील लहान मुलांना खाऊ, बिस्किटेचे वाटप करण्यात आले. यावेळी कॅप्टन मोहिते यांनी 1965 व 1971 च्या लढाईची माहिती दिली.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्रसंचालक प्रदीप बोरसे यांनी कामगारासाठी असणाऱ्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती दिली.
यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती चे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, केंद्र संचालक प्रदीप बोरसे, उपाध्यक्ष विकास शहाणे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामचंद्र कदम, विठ्ठल भजनी मंडळाचे अध्यक्ष जयवंत देवकर संचालक प्रकाश बंडेवार, पंडित वनसकर, ईश्वर सोनोने,शिवानंद तालीकोटी, जालंधर दाते, गुणवंत कामगार स्वानंद राजपाठक उपस्थित होते.

चॅलेंजर पब्लिक स्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी प्रमुख पाहुणे सुजित ब-हाटे आणि कमल गांगजी उपस्थित हॊते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. शाळेचे संस्थापक संदीप काटे यावेळी उपस्थित होते. आपल्या जवानांच्या शौर्याचे गुणवर्णन करणारे नृत्य विदयार्थी वर्गाने सादर केले .डौलाने तिरंगा फडकल्यावर सर्व विदयार्थी ,पाहुणे आणि पालक वर्गाने राष्ट्रगीत आणि झेंडा गीत सादर केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्ग यांचे सहाय्य लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम मोठया उत्साहाने पार पडला .

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. महिला व बालविकास समिती सभापती निर्मला कुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते विकास कुंजीर, पोलीस अधिकारी सुरेश भालेराव, भगवान गोडांबे, बाळासाहेब शेंडगे, अमोल घोलप, शशी जाधव, सुदाम जाधव, सुहास जुनावने, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, संस्थेचे सेक्रेटरी संदीप चाबुकस्वार व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीविद्या रमेश उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.