Pimpri : सर्व बांधकाम व्यवसायिकांना गृहप्रकल्पामध्ये सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक

एमपीसी न्यूज – बांधकाम व्यवसायिकांनी (Pimpri) बांधकाम पूर्णत्वाचे दाखले घेताना जो पर्यंत भामा आसखेडचा टप्पा क्रमांक पाच आणि सहा पूर्ण होऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होत नाही तो पर्यंत विकसक स्वखर्चाने पाणी पुरवतील. तसेच सोसायटी धारकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा असणारा प्रश्न म्हणजे प्रत्येक गृहप्रकल्पामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात यावी, तसेच प्रत्येक गृहप्रकल्पामध्ये इंटर कॉम सुविधा बांधकाम व्यावसायिक यांनी उपलब्ध करून द्यावी. या मागण्यांसाठी चिखली- मोशी -पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून आमदार महेश लांडगे तसेच आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.

फेडरेशनच्या मागण्यांना आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविल्यामुळे आता सोसायटीचा पाणीप्रश्न आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविण्यात येणार आहेत.

चिखली- मोशी -पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याबरोबर सोसायटीच्या समस्यांबाबत आयुक्तांच्या दालनात बैठक झाली.

या बैठकीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम व्यवसायिकांनी बांधकाम पूर्णत्वाचे दाखले घेताना जोपर्यंत भामा आसखेडचा टप्पा क्रमांक पाच आणि सहा पूर्ण होऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पूर्ण क्षमतेने पाणी पुरवत नाही तोपर्यंत विकासक स्वखर्चाने पाणी पुरवतील, असे लिहून घेतलेल्या हमीपत्राचे विकासकांनी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम-200 प्रमाणे गुन्हे दाखल करावे.

सदनिकाधारकांच्या संमतीशिवाय सतत केला जाणारा बांधकाम आराखड्यातील बदल, सोसायटीच्या साईड मार्जिनमध्ये (Pimpri) विकासक देत असलेल्या ओपन पार्किंग त्यामुळे सोसायटीमध्ये ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेडची गाडी फिरत नाही, पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम व्यवसायिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सादर केलेल्या बांधकाम आराखड्याप्रमाणे पूर्ण गृहप्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याशिवाय भाग पूर्णत्वाचे (पार्ट कंम्प्लिशन) दाखले देण्यात येऊ नयेत, अशा अनेक समस्यांबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली होती.

Hinjawadi : कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

या बैठकीमध्येच पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटी धारकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा असणारा प्रश्न म्हणजे प्रत्येक गृहप्रकल्पामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात यावी, तसेच प्रत्येक गृहप्रकल्पामध्ये इंटर कॉम सुविधा बांधकाम व्यावसायिक यांनी उपलब्ध करून द्यावी. या मागणीबाबत चर्चा झाली होती.

आमदार महेश लांडगे आणि चिखली- मोशी -पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या मागणीचा विचार करून आयुक्तांनी येथून पुढे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये होणाऱ्या सर्वच गृहप्रकल्पामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा तसेच इंटर कॉम यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले, “महापालिका आयुक्त तथा (Pimpri) प्रशासक शेखर सिंह यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून आमच्या फेडरेशनने ज्या-ज्या मागण्या त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत, त्या सर्वांचा सकारात्मक विचार करून त्या सोडवण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे.  त्यापैकीच आमच्या सोसायटी धारकांच्या सुरक्षिततेच्या बाबत अत्यंत महत्त्वाचा असणारा प्रत्येक गृहप्रकल्पामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा तसेच इंटरकॉम यंत्रणा बसवण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. त्याबद्दल आमदार महेश लांडगे आणि आयुक्त शेखर सिंग यांचे फेडरेशन तर्फे आभार.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.