Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर कामगार सेलच्या अध्यक्षपदी किरण देशमुख

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) कामगार सेल अध्यक्षपदी किरण चंद्रकांत देशमुख यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश कामगार सेल अध्यक्ष रामचंद्र खटकाळे यांच्या प्रमुख उपस्थित ही नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) कामगार सेल ची नवीन कार्यकारिणी २३ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश कामगार सेल अध्यक्ष रामचंद्र खटकाळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या उपस्थितीत यावेळी विविध नियुक्त्या करण्यात आल्या.

याप्रसंगी कामगार सेलच्या अध्यक्ष पदी किरण चंद्रकांत देशमुख यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणीच्या इतर पदाच्या नियुक्त्या हि याप्रसंगी जाहीर करण्यात आल्या.

नवनियुक्त पद धारकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक राजू बनसोडे, मुख्य संघटक सचिव अरुण बोऱ्हाडे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2
You might also like