Pimpri : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करा – आप युवा आघाडीची मागणी

Pimpri: Make student travel free from CM Assistance Fund - Demand of AAP Youth Front

एमपीसी न्यूज – अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रवास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मोफत करण्यात यावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केली आहे.

चेतन बेंद्रे म्हणतात, राज्य सरकारने रातोरात आपला निर्णय बदलून मोफत एसटी बस सेवा ही केवळ महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील मजुरांसाठी असेल असा निर्णय दिला आहे. एका बाजूला शासनाने कोटा शहरातून विद्यार्थ्यांना आराम बसमधून मोफत आणले, दुसरीकडे  पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी रोजगाराची संधी शोधत, स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना दुप्पट तिकीट आकारण्याचा निर्णय म्हणजे गेले दीड महिने अडकून पडले विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे.
स्पर्धा परीक्षा तसेच शालेय व महाविद्यालयीन परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी विद्यार्थी अनावश्यक अडकून पडले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील व सामान्य कुटुंबामधून असल्यामुळे अशा परिस्थितीत यांच्याकडून तिकीटाचे पैसे घेणे हे सरकारला न शोभणारी गोष्ट आहे. यामुळे सरकारने त्वरित आपला निर्णय बदलावा व अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मोफत एसटी बस ने घरी पोहोचवावे अशी मागणी चेतन बेंद्रे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.