Mumbai : कोरोना युद्धात लढणारे तुम्ही सैनिक आहात, तुमचा भाऊ म्हणून सदैव तुमच्यासोबत राहणार -जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे परिचारिकांना भावनिक पत्र

एमपीसी न्यूज – कोरोना युद्धात लढणारे सैनिक तुम्ही साऱ्या परिचारिका आहात, तुमचा भाऊ म्हणून सदैव तुमच्यासोबत राहणार असे भावनिक पत्र जागतिक परिचारिका दिनानिमित्त जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सर्व परिचारिकांना उद्देशून लिहिले आहे.

परिचारिकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील म्हणतात, जगात प्रत्येक व्यक्ती आर्थिक प्राप्तीसाठी काही ना काही काम करत असते, पण खूप कमी कामे अशी असतात जी नोकरी देखील असते आणि समाजाची सेवा देखील.

परिचारिका म्हणुन नोकरी हा त्या सेवेचाच भाग आहे. आज सारे जग कोविड-19 सारख्या अत्यंत गंभीर युद्धात लढत असताना, या युद्धात सैनिक मात्र तुम्ही साऱ्या परिचारिका आहात.

या लढाईचे नेतृत्व देखील तुमच्याकडेच आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही समाजाची सेवा करत आहात, याची आम्हा सगळ्यांना पूर्ण जाणीव आहे.तुमच्या मेहनतीमुळेच हे संपूर्ण जग कोविड-19 च्या या अत्यंत वाईट अशा काळातून बाहेर पडेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

या साऱ्या काळात तुम्ही स्वत:ची आणि कुटुंबियांची जरूर काळजी घ्या. तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या सोबत आहे अशी भावनिक साद जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी परिचारिकांना दिनानिमित्त सर्व परिचारिकांना घातली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.