BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : नादुरुस्त फुटपाथ, चेंबरची तातडीने दुरुस्ती करा; महापौरांच्या सूचना

117
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नादुरूस्त फुटपाथ व चेंबर तातडीने दुरूस्त करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिका-यांना दिल्या.

महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या मिळकती, उद्याने, क्रीडांगणे, समाज मंदिर, सांस्कृतिक हॉल, स्पर्धा परीक्षा केंद्र यांना भेटी देतेवेळी महापौर जाधव यांनी सूचना दिल्या. यावेळी ‘ग’ प्रभाग अध्यक्ष बाळासाहेब त्रिभुवन, नगरसदस्य अर्चना बारणे, झामाबाई बारणे, सविता खुळे, चंद्रकांत नखाते, उषाताई वाघेरे, संदीप वाघेरे, निकिता कदम, प्रभागाचे स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, विनोद तापकीर, संदीप गाडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शरद गावडे, क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे, कार्यकारी अभियंता मनोज शेठीया, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर उपस्थित होते.

महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या थेरगाव येथील बोट क्लब, बापुजीबुवा उद्यान व ओपन जीम, वेंगसरकर क्रिकेट अकादमी, शिवाजी महाराज उद्यान डांगे चौक, केजूदेवी उद्याव, संभाजी उद्यान रहाटणी, पिंपरी येथील नवमहाराष्ट्र शाळेतील गाळे, जोग महाराज उद्यान पिंपरी, दशरथ कापसे व्यायामशाळा पिंपरी, साधु वासवाणी उद्यान, पिंपरी, हेमु कलाणी उद्यान पिंपरी या ठिकाणी भेट देत महापौर जाधव यांनी पाहणी केली.

उद्यानामध्ये ओपन जीम बसविणे व कारंजे दुरूस्त करुन सुरू करणे, क्रीडांगणावर लाईटची व्यवस्था करणे, स्वच्छता मोहिमे अंतर्गत वॉर्डात स्वच्छता राखणे, दररोज साफसफाई करणे, राडारोडा उचलणे, स्ट्रॉम वॉटर लाईन मधील चेंबर दुरूस्त करणे, काळेवाडी बीआरटी रोड स्वच्छ करणे, कचरा उचलणे, केजूदेवी मंदिरासमोरील नदीकडेच्या बाजूस कचरा उचलणे, नदीजवळील नावाचे/ सूचना फलक बोर्ड दुरूस्त करणे. क्रीडांगणे विकसित करणे, बोट क्लब येथील व्यायामशाळेला आवश्यक साहित्य पुरविणे, उद्यानातील भंगार साहित्य उचलणे, नवमहाराष्ट्र शाळेसमोरील गाळ्यांचे भाडे कमी करणे व रिक्त गाळे भाड्याने देणे अशा विविध सूचना महापौर राहुल जाधव यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.