Bhosari : परप्रांतीय कामगारांची आयुक्तालयाकडून तपासणी व्हावी-  अभय भोर

एमपीसी न्यूज-एमआयडीसी मध्ये परप्रांतीय कामगारांकडून व भंगारच्या दुकानांमुळे चोऱ्यांमध्ये ( Bhosari ) वाढ होत आहे. यासाठी कंपन्यांमधील तसेच हॉटेल व्यवसायिकांकडे असलेल्या परप्रांतीय कामगारांची वेळोवेळी आयुक्तालयाकडून तपासणी व्हावी अशी मागणी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष  अभय भोर यांनी आज भोसरी एमआयडीसी येथे आयोजित बैठकीत केली .

सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1, पिंपरी चिंचवड बाळासाहेब कोपनर,सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग  सतीश कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन  राजेंद्र निकाळजे यांच्याकडे चोऱ्या थांबविण्यासाठी उपयोजना करण्याची मागणी करण्यात आली.

भोसरी एमआयडीसी परिसरामध्ये अनेक कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसीसवर पर राज्यातील कामगार कामाला येतात. तसेच या ठिकाणी असलेले हॉटेल, टपरी या ठिकाणी देखील अनेक परप्रांतीय कामाला आहेत. परंतु हे परप्रांतीय रात्रीच्या वेळेस एमआयडीसी मध्ये चोऱ्या करण्यास सुद्धा पुढाकार घेत असल्याचे दिसून येते .

Bhosari : डॉमिनोज फ्रेंचायझी देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची एक कोटींची फसवणूक

यामध्ये कमी वयाचे देखील अनेक तरुण समाविष्ट असून त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे आधार कार्ड किंवा कागदपत्रे आढळून येत नाहीत चोऱ्या करून ही मंडळी गावाला निघून जातात आणि चोऱ्यांचा प्रमाणामध्ये वाढ होताना दिसत असून या ठिकाणी असलेली छोटी मोठी भंगारची दुकाने देखील याला कारणीभूत आहेत .

चोरी केल्यानंतर  भंगार व्यवसायिकांना या चोरांमार्फत हा मालपुरवठा केला जातो. एमआयडीसी परिसरामध्ये पोलीस आयुक्तालयातर्फे वेळोवेळी तपासणी मोहीम हाती घेतल्यास एमआयडीसीतील चोऱ्यां थांबविल्या जाऊ शकतात .

तरी पोलीस आयुक्तालयाकडून त्वरित एमआयडीसीतील कामगारांची तपासणी मोहीम हातात घेऊन प्रत्येक हॉटेल व्यवसायिक व्यापारी आणि कंपनीने आपल्याकडे कामाला ठेवणाऱ्या व्यक्तीचे कागदपत्र जवळ ठेवणे गरजेचे आणि सक्तीचे करावे ,अशी मागणी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष  अभय दादा भोर यांनी आज केली .यावेळी यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त साहेबांनी उद्योजकांच्या समस्यांकडे गांभीर्याने समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्यात येणार असल्याचे ( Bhosari ) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.