Pimpri : आरोग्य मित्र फाउंडेशनला आवश्यक ती मदत महापालिका करेल – जितेंद्र वाघ

एमपीसी न्यूज – आरोग्य मित्र फाउंडेशन तर्फे (Pimpri) जो उपक्रम राबवला जात आहे, तो अतिशय चांगला आहे व त्याचा जनतेला प्रचंड फायदा होत आहे. आरोग्य मित्र फाउंडेशन सामान्य लोकांमध्ये आरोग्या विषयी जनजागृती पसरवत आहे, ही खूप चांगली बाब आहे. त्यामुळे आरोग्य मित्र फाउंडेशनला जी मदत लागेल, ती महापालिकेकडून करण्यात येईल, असे आश्वासन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिले.

आरोग्यमित्र फाऊंडेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम चिंचवड येथील सायन्स पार्क येथे गुरुवारी (दि.7) आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. सुशील मुथीयान (आय. एम. ए. पिंपरी चिंचवड अध्यक्ष), डॉ. अनिरुद्ध टोनगावकर (आय.एम.ए.चे सेक्रेटरी), डॉ. श्रीकृष्ण जोशी आणि आरोग्य मित्र फाउंडेशनकडून डॉ. पवन साळवे, राजीव भावसर, हृषिकेश तपशाळकर, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ. वर्ष डांगे, गणेश जवळकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

Pimpri – Chinchwad RTO : आरटीओच्या वायुवेग पथकाकडून सव्वासात हजार जणांवर कारवाई; 11 हजार जणांचे समुपदेशन

वाघ पुढे म्हणाले की, सध्या (Pimpri) अनेकजण स्वतः ठरवून औषधे घेतात. त्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे. प्रतिकार शक्ती कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावेत. पुढे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी आरोग्य मित्र फाऊंडेशनला पालिकेकडून व वैयक्तिक पातळीवर मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरीचे मूर्ती पूजन करण्यात आले. डॉ. पवन साळवे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. साळवे यांनी आरोग्यमित्र फाउंडेशन तर्फे समाजोपयोगी व गरजू व्यक्तींना आरोग्य बाबतीत मदत कशी करता येईल? याची माहिती दिली.

आरोग्य मित्र फाउंडेशनच्या मार्फत सामान्य लोकांना कार्यशाळा, डिजिटल मीडिया यांच्याद्वारे आरोग्यबाबतीत माहिती दिली जाते. आरोग्य मित्र फाउंडेशनचे राजीव भावसार यांनी आरोग्यमित्र फाउंडेशनच्या आजवर झालेल्या प्रवासाबाबतीत माहिती दिली.

यामध्ये प्रामुख्याने 9 बॅचेस आणि एकंदरीत 199 आरोग्य मित्र तयार करण्यात यश मिळाले आहे. या बरोबर जनजागृतीसाठी ‘आरोग्य कट्टा’मार्फत विविध घटकांसाठी मानसिक आरोग्यावर प्रशिक्षण, देहदान व अवयव दान सत्र, एफएम 90.4 रेडिओवर आरोग्य विषयक आरोग्य माहिती व तसेच विविध संस्थेबरोबर करार झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी आरोग्य मित्रांचे अनुभव व्हिडिओद्वारे दाखवले गेले. त्याच्यानंतर संचालक मंडळाला (बोर्ड ऑफ डायरेक्टर्स) नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. आरोग्य मित्र फाउंडेशनच्या पुढील वाटचाली बाबतीत नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश जवळकर यांनी माहिती दिली.

यावेळी आरोग्य मित्र फाउंडेशनचे सहयोगी जसे की लोकमान्य हॉस्पिटल, एफएम 90.4, मनाची व्यायामशाळेचे डॉ. राजीव नगरकर, सायन्स पार्कचे प्रवीण तुपे जी, डॉ. वैशाली भारंबे, डीसीबी बँक, मेडि कव्हर हॉस्पिटल आणि टाटा मोटर्स यांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले.

लोकमान्य हॉस्पिटलचे CEO डॉक्टर श्रीकृष्ण जोशी यांनी लोकमान्य हॉस्पिटल जनतेसाठी तसेच आरोग्य मित्रांसाठी नेहमी मदत करेल, असे विचार सर्व उपस्थितांसमोर व्यक्त केले. यावेळी मेडि कव्हर हॉस्पिटल, भोसरी (प्रणाली घोडके व इतर स्टाफ) युनायटेड भावसार ऑर्गनायझेशन (मनोज भावसार व राजीव रातीलाल भावसार) व आरोग्य मित्र फाउंडेशनमध्ये फॅमिली हॉस्पिटल या संकल्पनेवर आधारित करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या.

या कार्यक्रमास सूर्यकांत मुथीयान, मनीषा हिंगणे, स्नेहा फुलकर, डॉ. अभय कुळकर्णी ह्यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तसेच आभाराचे काम लक्ष्मीकांत भावसार यांनी सांभाळले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.