Pimpri: संतपीठ शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा


एमपीसी न्यूज  -पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ (Pimpri)स्कूल अँन्ड ज्यु. कॉलेजचे संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे, संचालिका डॉ.स्वाती मुळे यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्या आला.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँन्ड ज्यु. कॉलेजचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका स्नेहल पगार आणि समन्वयिका मयुरी मुळुक यांच्या
हस्ते वैज्ञानिक सर सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँन्ड ज्यु. कॉलेजचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देऊन
दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व सांगितले.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँन्ड ज्यु. कॉलेजच्या विज्ञान विषयाच्या शिक्षिका दीपमाला जयस्वाल
यांनी प्रास्ताविका मध्ये या कार्यक्रमाचे उदिष्टे स्पष्ट करीत राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी युवराज आंबरे याने शास्त्रज्ञ सर
सी. व्ही. रमन यांच्याविषयी माहिती सांगितली.

Pune : शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यास थेट फौजदारी

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रश्नमंजुषा उपक्रमात इयत्ता सहावीचे विद्यार्थी ओम सोनवणे व ध्रुव माळी तसेच इयत्ता सातवीचे विद्यार्थिनी खुशी शर्मा व समिधा सुरळकर यांनी प्रश्न विचारले तर तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली.

विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण प्रकल्प सादर केले. या सर्व प्रकल्पांचे प्रदर्शन भरवून विज्ञान विषयातील संकल्पनांचे चित्रे व
प्रात्यक्षिकांद्वारे बाल वैज्ञानिकांचे भावविश्व उलगडले.

सदर प्रदर्शनाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. मनोरंजक विज्ञान दालनाला भेट देऊन पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्पांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना देसाई यांनी केले.व आभार प्रदर्शन जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँन्ड ज्यु. कॉलेजचे विज्ञान विषयाचे शिक्षक संतोष खोटे यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.