Pimpri News : शहरवासीयांची तहान भागविणा-या पवना धरणात 42 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान (Pimpri News) भागविणा-या मावळातील पवना धरणात आजमितीला 42.08 टक्के इतका पाणीसाठा आहे. जुलै अखेर पर्यंत पुरेल एवढा हा साठा असून गतवर्षीच्या आजच्या तारखेला 42.37 टक्के पाणीसाठा होता.

पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणामध्ये यंदा एप्रिलच्या मध्यात दिलासादायक पाणीसाठा आहे. यावर्षी पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने तब्बल तीनवेळा धरण शंभर टक्के भरले होते. पाणलोट क्षेत्रात यंदा दोन हजार 777 मिली मीटर पावसाची नोंद झाली.

तर, गतवर्षी दोन हजार 722 मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्यावर्षीपेक्षा 55 मिमी पावसाची अधिक नोंद झाली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत पवना धरण तुडुंब भरले होते.

एप्रिलच्या मध्यात देखील धरणात 42.08 टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. त्यामुळे शहरवासीयांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाही. धरणातील पाणीसाठा पुरेसा असला. तरी, आता उन्हाळा वाढू लागला आहे.

त्यामुळे पाण्याचा वापर वाढेल. कडक उन्हाच्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

पवना धरणाचे शाखा अभियंता समीर मोरे म्हणाले, धरणात आजमितीला 42.08 टक्के इतका पाणीसाठा आहे. जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा (Pimpri News) आहे.

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस भरतीची गुणवत्ता यादी जाहीर; महिला उमेदवाराची बाजी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.