Pimpri News : मोलकरणीने चोरला अंगठीतील दोन लाखांचा हिरा

एमपीसी न्यूज  – घरात काम करणाऱ्या मोलकरणीने बेडरूममधून 2 लाख 9 हजार 28 रुपये किंमतीची अंगठी चोरली. त्यातील हिरा काढून घेत अंगठी सोसायटीमध्येच फेकून दिली. ही घटना 31 डिसेंबर रोजी सकाळी रहाटणी (Pimpri News) येथे घडली.

याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने वाकड (Pimpri News) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोलकरीण महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime : धक्कादायक! केवळ व्हॉट्सअप ग्रुपमधून काढल्याने जीभच कापलीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेने 31 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घरातील स्वच्छता करण्याच्या बहाण्याने बेडरूम मधून 2 लाख 9 हजार 28 रुपये किमतीची अंगठी चोरली. त्यानंतर अंगठी मधील डायमंड काढून अंगठीचे नुकसान करून अंगठी 2 जानेवारी रोजी फिर्यादी यांच्या सोसायटीच्या गेटच्या आत फेकून दिली. वाकड पोलीस (Pimpri News) तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.