Pimpri News : कर्करोगाच्या लक्षणांबद्दल सावधगिरी बाळगा : डॉ. संकेत बनकर

एमपीसी न्यूज – जागतिक फुप्फुसांचा कर्करोग दिवस 1 ऑगस्टला पाळण्यात येतो. त्यानिमित्त वाचूयात पुण्यातील कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे वरिष्ठ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. संकेत बनकर यांची विशेष मुलाखत !

फुप्फुसांच्या कर्करोगाच्या सामान्य लक्षणांबद्दल लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. फुप्फुसांच्या कर्करोगामध्ये रोगाचे निदान होईपर्यंत अनेकदा लक्षणे दिसत नाहीत. लवकर निदान झाल्यास तत्काळ आवश्यक उपचार मिळू शकतात. लवकर निदान हे जलद आणि प्रभावी उपचारांमध्ये मदत करू शकते, अशी माहिती कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे वरिष्ठ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॅा. संकेत बनकर यांनी दिली.

‘बीएमजे’च्या अहवालानुसार, भारतात फुप्फुसांच्या कर्करोगात स्टेज 1 मध्ये निदान झाल्यास जगण्याचा दर 87.3 इतका आहे. तर स्टेज 4 मध्ये हे प्रमाण अवघे 18.7 टक्के इतकेच आहे. लवकर झालेले निदान हे उपचारांमध्ये अधिक प्रभावी ठरतात.

फुप्फुसांच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष द्या. श्वास लागणे, खोकला, छातीत दुखणे, पाठ किंवा खांद्यावर खोकणे, हसणे किंवा खोल श्वास घेणे आणि भूक कमी होणे ही लक्षणे आहेत. आवाजाचा कर्कशपणा किंवा घरघर ही देखील सुरुवातीच्या सामान्य लक्षणांपैकी एक आहे.

चेहरा किंवा मान सूजणे, गिळताना त्रास होणे किंवा वेदना होणे, अशी लक्षणे असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॅा. संकेत बनकर यांनी केले आहे.

फुप्फुसांच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे फुप्फुसांच्या कोणत्या भागावर परिणाम करतात यावर उपचार अवलंबून असतात. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागतील. ज्यात इमेजिंग चाचण्या, थुंकीच्या सायटोलॉजी आणि ऊतींचे नमुने (बायोप्सी) समाविष्ट आहेत, असेही डॉ. बनकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.