Pimpri News : सोहम सार्वजनिक ग्रंथालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज –  सोहम सार्वजनिक ग्रंथालयात 74 वा प्रजासत्ताक दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत व ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा (Pimpri News) कऱण्यात आला.

यावेळी  पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे सर व पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी पीएसआय सतेश जाधव, नगरसोविका सुजाता पलांडे, ग्रंथालयाचे वरिष्ठ लिपीक सुदाम तारक, किरण सुवर्णा, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश नागरगोजे सामाजिक कार्यकर्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी स्थानिक नागरिक व स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rathasaptami Special : रथसप्तमी चे खगोलशास्त्रीय महत्व

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की,  राज्यघटनेच्या संस्थापकांनी आपल्याला एक मार्ग आणि नैतिक चौकट आखून दिली आहे. या मार्गावरून वाटचाल करणे ही आपली जबाबदारी आहे. देशाच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कायमच ऋणी राहीन. स्पर्धा परीक्षांच्या मुलांनी घटनेचा सर्वांगानी अभ्यास करणे गरजेचे आहे.

पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चाटे यांनी स्पर्धा परीक्षांच्या मुलांना बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच सुजा पलांडे यांनी सोहम सार्वजनिक ग्रंथालय व  अभ्यासिकेच्या कार्याची प्रशंसा केली . या अभ्यासिकेतून हजारो अधिकारी घडावेत , अशी  सदिच्छा  प्रकट केली.  अनिल उपाध्ये यांनी आभार मानले कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथालयाच्या (Pimpri News) ग्रंथपाल वर्षा बोरसे व माधुरी नेरकर यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.