Pimpri News: एमपीसी न्यूजच्या शिक्षण संवाद उपक्रमाला पालिका आयुक्त व महापौरांच्या शुभेच्छा!

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील अग्रगण्य ‘एमपीसी न्यूज’ वेब पोर्टलने शिक्षण संवाद हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षण क्षेत्रातील विविध घडामोडी, उपयुक्त माहिती, शिक्षण विषयक सदर आणि विविध माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील आणि महापौर उषा ढोरे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘एमपीसी न्यूज’च्या शिक्षण संवाद या नवीन्यपूर्ण उपक्रमाचा सर्वांना निश्चित फायदा होईल असे त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

शिक्षण संवाद उपक्रमाला शुभेच्छा देताना पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ‘एमपीसी न्यूज’ वेब पोर्टलने हाती घेतलेल्या शिक्षण संवाद या उपक्रमाअंतर्गत केजी टु पिजी पर्यंतच्या शिक्षणावर चर्चा केली जाणार आहे. एमपीसीने एक चांगले व्यासपीठ निर्माण केले आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षात मोठा परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेता आले नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षण संवाद हा उपक्रम महत्वपूर्ण आहे. एमपीएससीच्या या उपक्रमाला सर्व पदाधिकारी व शहरवासीय यांच्या वतीने शुभेच्छा देते.’

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ‘एमपीसी न्यूज’चा शिक्षण संवाद हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केजी टु पिजी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. शिक्षण संवादाच्या माध्यमातून एमपीसी केजी टु पिजी विविध विषयांवर चर्चा घडवून आणत आहे. हा उपक्रम पालक, विद्यार्थी, शिक्षकांना फायदा होईल, या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पालिकेच्या शाळेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

शिक्षण सर्वांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. जगाची प्रगतीच्या दिशेने झपाट्याने वाटचाल सुरू आहे. सहज उपलब्ध झालेल्या इंटरनेटमुळे सर्वच क्षेत्रात मोठी डिजिटल क्रांती झाली आहे. शिक्षण क्षेत्र देखील झपाट्याने बदलत आहे. नव नवीन शैक्षणिक ट्रेंड आजकाल प्रसिद्ध झाले असून, त्यात दिवसेंदिवस नव्यानं वाढ होत आहे. केंद्र सरकारने देखील पारंपरिक शिक्षण पद्धतीला छेद देऊन नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. तंत्रज्ञान आणि आधुनिक जगात तग धरून राहण्यासाठी बदलत्या काळानुसार बदलायला हवं आहे, नवीन कौशल्य आत्मसात करण्याला पर्याय नाही.

‘एमपीसी न्यूज’ने यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला असून, शिक्षण संवाद हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील तज्ञ लोकांच्या मार्फत विविध विषयांवर प्रकाश टाकला जाईल.

महापौर उषा ढोरे यांचा शुभेच्छा संदेश

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचा शुभेच्छा संदेश

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.