Pimpri News: गृहविलगीकरणातील रुग्णांना मिळणार कन्सल्टेशनची सुविधा !

एमपीसी न्यूज – गृहविलगीकरणातील रुग्णांवर उपचार करण्याची इंडियन मेडिकल असोसिएशनने तयारी दर्शविली आहे. गृहविलगीकरणासाठी निर्देशित केल्यानंतर रुग्णास संबंधित डॉक्टरने सूचविलेल्या तपासण्या करून प्राप्त रिपोर्टनुसार वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येईल. उपचार कालावधीत रुग्णामार्फत दररोज डॉक्टरशी दूरध्वनीद्वारे कन्सल्टेशनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेसाठी प्रति रुग्ण दहा हजार रुपये डॉक्टर घेणार आहेत. रुग्णाला ते शुल्क द्यावे लागणार असून ही सुविधा पूर्णतः ऐच्छिक स्वरूपाची आहे.

पिंपरी चिंचवड शहरामधील कोविड 19 विषाणूची बाधा झालेल्या गृह विलगीकरणामधील रुग्णांना खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यामार्फत वैद्यकीय सल्ला तसेच उपचार पुरविण्याचे नियोजन करण्याबाबत महापालिका आणि इंडियन मेडीकल असोसिएशनच्या प्रतिनिधीं समवेत आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत 5 एप्रिल रोजी बैठक झाली.

त्यानुसार असोसिएशनने सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. पिंपरी-चिंचवड, भोसरी शाखेचे सदस्य असलेल्या डॉक्टरांचा व्हॅटसप ग्रूप तयार करण्यात आला. या डॉक्टरमार्फत तपासणी केली जाणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णास 1 वेळा पॅनलवरील खासगी वैद्यकीय अधिकाऱ्याकडे भेट देऊन तपासणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार रुग्णास विलगीकरणाचा सल्ला अथवा रुग्णालयामध्ये दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच गृहविलगीकरणासाठी निर्देशित केल्यानंतर रुग्णास संबंधित डॉक्टरने सूचविलेल्या तपासण्या करून प्राप्त रिपोर्टनुसार वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येईल.

उपचार कालावधीत रुग्णामार्फत दररोज डॉक्टरशी दूरध्वनीद्वारे कन्सल्टेशनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेसाठी प्रति रुग्ण दहा हजार रुपये डॉक्टर घेणार आहेत. रुग्णाला ते शुल्क द्यावे लागणार आहे.

असोसिएशमार्फत पॅनलवरील 45 वैद्यकीय अधिकाऱ्यांची यादी दिली आहे. गृहविकगीकरणासंबधी रुग्णासाठी व काळजीवाहकसाठी सूचना देण्यात आल्या आहेत. ही सुविधा पूर्णतः ऐच्छिक स्वरूपाची आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.