Mumbai news: मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज (शनिवारी) लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठाकरे यांच्यावर कमरेजवळच्या स्नायूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

राज ठाकरे यांच्या कंबरेचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे त्यांना बसण्यास त्रास जाणवत होता. उपचारासाठी राज ठाकरे यांनी 3 दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात MRI चाचणी केली होती.

_MPC_DIR_MPU_II

आज त्या स्नायूवर छोटी शत्रक्रिया करण्यात येणार होती. शस्त्रक्रिया झाल्यावर दुसऱ्या दिवशीच त्यांना रुग्णालयातून घरी पाठवले जाईल, अशी माहिती मिळाली आहे.

याबाबतचे वृत्त मराठी वाहिन्यांनी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.