Pimpri News : रोबोटिक्सचा शालेय शिक्षणात समाविष्ट करणे काळाची गरज; एससीसीआयपी अध्यक्ष रेनया किकूची यांचे मत

एमपीसी न्यूज –  रोबोटिक्स शिक्षण प्रशिक्षणामुळे शालेय विद्यार्थ्यांना आपले विचार नाविन्यपूर्ण करण्यात मदत होईल. रोबोटिक्स शिक्षण कसे मजेदार प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन संकल्पना उत्पन्न करतील आणि ही नवीन संकल्पना समाजाला उपयोगी होऊ शकते, अशी माहिती जपान येथील रोबोटिक्स अभ्यासक व एससीसीआयपी अध्यक्ष रेनया किकूची यांनी दिली.

चिखली मोशी येथील इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल, येथे बुधवारी (दि. २७) स्टेम रोबोटिक्स प्रशिक्षण या विषयावर मार्गदर्शन करताना रेनया किकूची बोलत होते.

इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला रोबोटिक्स शिक्षण ही मोलाची भूमिका पार पाडेल. सीबीएसई अभ्यासक्रमात नवीन शिक्षण प्रणालीमध्ये रोबोटिक्स प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे. सीबीएसई शाळेत या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये रोबोटिक्स प्रशिक्षणावरही भर देण्यात आला आहे.

इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलमधील विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे प्रात्यक्षिक रेनया किकूचीचे यांचे सहकारी श्री डॅनिअल यांनी करून दाखविले. शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रात्यक्षिकमध्ये आवर्जून भाग घेतला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे डॅनिअल यांनी दिली.

यावेळी इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलच्या संचालिका कमला बिष्ट,  डॉ. गिरीश देसाई, कार्यकारी संचालक, पिंपरी चिंचवड एजुकेशन ट्रस्ट, श्री डेनियल, डॉ. संजय सिंग, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.