Pimpri News : इंटरमिजिट परीक्षेमध्ये महेर पटेल राज्यात प्रथम

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाकडून 2022 मध्ये घेण्यात ( Pimpri News ) आलेल्या चित्रकला इंटरमिजिट परीक्षेचा निर्णय नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत पिंपरी चिंचवड मधील सेंट उर्सुला शाळेतील इयत्ता 10 वी ची विद्यार्थिनी महेर हितेश पटेल ही राज्यगुणवत्ता यादीत  सर्व प्रथम आली. तसेच स्मरणचित्र विषयातील विशेष पारितोषिक प्राप्त केले. 2019 मध्ये झालेल्या एलिमेंटरी परिक्षेतही ती राज्य गुणवत्ता यादीत आलेली होती.

Pimpri News : विविध मागण्यांसाठी 14 मार्च पासून संपावर जाण्याचा कर्मचारी फेडरेशनचा इशारा

 

पुणे जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी  पुणे येथील लोकशाहीर आणाभाऊ साठे सभाग्रहात घेण्यात आलेल्या कला शिक्षकांच्या कार्यशाळेत  राज्याचे माजी कलासंचालक दिलीप बोरले यांचे हस्ते महेरला सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्हा संघाचे अध्यक्ष मिलिंद शेलार व राज्य उपाध्यक्ष किरण सरोदे यांनी तिचे विशेष कौतुक केले.

महेर  ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी येथे चित्रकलेचे प्रशिक्षण घेत असून परीक्षेसाठी  कलाध्यापक अशोक कामथे सरांचे मार्गदर्शन लाभले. आई वडिलांचे  सहकार्य मिळाले.महेर सायकलिंग व स्केटिंग ( Pimpri News ) मधेही निपुण असून सुवर्ण पदक आणि इतर अनेक पदके मिळविली आहेत. सेंट उरसुलाच्या  मुख्याध्यापिका सिस्टर व्हॅलरी व सर्व शिक्षकांनी महेरच्या  यशाबद्दल आनंद व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.