Talegaon Dabhade : नगरपरिषदे मार्फत चार ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन सुरू

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदे मार्फत शहरात चार ठिकाणी (Talegaon Dabhade ) ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरु करण्यात आले आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी ई-व्हेईकलचा वापर करण्याचे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे. 

माझी वसुंधरा अभियान 3.0 सुरु झाले असून या अंतर्गत पृथ्वी,अग्नी, जल,वायू,आकाश या निसर्गाशी संबंधित पाच तत्वासोबत जीवन पद्धती अंगीकारल्याशिवाय आपण शाश्वत विकास करू शकणार नाही. सद्यस्थितीत हीच वेळ निसर्गास साथ देण्याची आहे. त्यासाठी निसर्गाशी संबंधित या पाच तत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे आपल्या शहरामध्ये राबविण्यात येत आहे.

Pimpri News : इंटरमिजिट परीक्षेमध्ये महेर पटेल राज्यात प्रथम

यामध्ये घनकचरा व्यवस्थापन करणे,ओला कचरा,सुका कचरा वर्गीकरण करणे, अपारंपरिक उर्जा स्त्रोतचा वापर करणे, सौर उर्जा साधने,इलेक्ट्रिक वाहन वापरणे, प्लास्टिक बंदी, कापडी पिशवी वापरणे, वृक्षारोपण करणे,वृक्ष संवर्धन करणे अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.

इलेक्ट्रिक बाईकच्या चार्जिंगसाठी नगरपरिषदेणे शहरात चार ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरु केली आहेत. ही चार्जिंग स्टेशन्स 1. मारुती मंदिर चौक येथील नगरपरिषद कार्यालय, 2. सरदार अजितसिंहराजे व्यापारी संकुल “बी” विंग इमारतीचे पार्किंग, 3. तळेगाव रेल्वे स्टेशन बाहेरील नगरपरिषदेच्या सार्वजनिक सौचालयाच्या बाहेरील बाजूस 4. तळेगाव स्टेशन भागातील लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा क्र. 3  च्या आवारात सुरु करणेत आली आहेत.

तळेगाव दाभाडे शहरातील इलेक्ट्रिक वाहनांची एकून संख्या 20868 आहे. यामध्ये 18991 दुचाकी, 1407 चार चाकी कार्स, 11 सार्वजनिक वाहतूक बसेस,390 तीनचाकी वाहने, 8 मालवाहतूक वाहने व 61 मोटर कॅब्स अशी एकूण 20868 इलेक्ट्रिक वाहनांची नोंद असल्याचे नगर परिषद प्रशासनाने सांगितले.

तळेगावकर नागरिकांच्या सहकार्याने व सहभागाने आपले तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade ) शहर प्रदूषण मुक्त ठेवता येणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.