Pimpri News: महापालिका पर्यावरण विभागातर्फे जागतिक जल दिनानिमित्त उद्या ‘जलयुक्त पिंपरी-चिंचवड शहर’ कार्यक्रम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे जागतिक जल दिनानिमित्त ‘जलयुक्त पिंपरी चिंचवड शहर’ कार्यक्रमाचे उद्या (मंगळवारी) आयोजन करण्यात आले आहे.

मोरया गोसावी मंदिर, चिंचवड येथे सकाळी 8 वाजता नदी स्वच्छता अभियान होणार आहे. यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका, डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सामाजिक संस्था यांचा सहभाग राहणार असून पवना नदीकाठ स्वच्छता व पवना आरती करण्यात येणार आहे.

माहिती, जनजागृती व सांस्कृतिक करमणूक कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटीमार्फत पाणी विषयावरील कामांची माहिती व उपक्रमांचे सादरीकरण (नदीसुधार, स्काडा, 24X7 पाणीपुरवठा, STP, स्मार्ट सिटी प्रकल्प) पाणी संवर्धनबाबत सामाजिक संस्थांचे योगदान यावर सादरीकरण, जल संवर्धन यावर योगदान देणाऱ्या सामजिक संस्था, संघटनांचा सन्मान, आयुक्त राजेश पाटील यांचे मार्गदर्शन आणि आवाहन, पाणी प्रतिज्ञा यांचा कार्यक्रमात समावेश आहे.

“सरिता.. प्रवाहिता” हा पाणी विषयावर जनजागृतीपर नृत्य व संगीत युक्त सांस्कृतिक कार्यक्रम, कलाश्री नृत्यशाळा, कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत आयोजित करण्यात आला आहे, तेव्हा जास्तीत जास्त नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.