Pimpri News: गिरीश प्रभुणे यांना मालमत्ता जप्तीची नोटीस, महापालिका तर भाजपच्या ताब्यात – अजित पवार

एमपीसी न्यूज – पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या गिरीश प्रभुणे यांच्या क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम संस्थेला महापालिकेने मालमत्ता कर थकविल्याची नोटीस दिली आहे. संथेने 1 कोटी 83 लाख मालमत्ता कर थकविला आहे. यावर उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. कोणाला कोणताही पुरस्कार मिळाला. तरी, प्रत्येकाने आपले जे काही रेकॉर्ड असते ते क्लिअर ठेवावे.

याबाबत अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार, हे बघा..यासंदर्भात मला काही माहिती नाही. पिंपरी-चिंचवड महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. मला तुमच्याकडूनच ही गोष्ट समजतंय. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आठ दिवसांकरिता रजेवर गेले आहेत. ते रजेवर जाऊन तीन दिवस झाले आहेत.

ते आल्यानंतर मी त्यासंदर्भात विचारीन, आणि कोणाला कोणताही पुरस्कार मिळाला. तरी, प्रत्येकाने आपले जे काही रेकॉर्ड असते ते क्लिअर ठेवले पाहिजे. म्हणजे तुम्ही आज पत्रकार आहात. म्हणून तुम्हाला थकबाकी किंवा काही कशाला माफी नसते. आम्ही जरी उपमुख्यमंत्री असलो. तरी आम्ही ज्या शहरात राहतो. त्या शहरातील टॅक्स भरावा लागतो. या केसबद्दल मला काहीच माहिती नाही. मी माहिती घेईन आणि ते अन्याकारक असेल. तर दूर करेल आणि ते जर योग्य असेल. तर, त्यांना विनंती करेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.