Pimpri News: प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदी सचिन साठे, गौतम अरकडे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारिणीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातून सचिन साठे व गौतम अरकडे यांची चिटणीस या पदावर नियुक्ती झाली आहे. अखिल भारतीय काँग्रेसच्या मान्यतेने प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची यादी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये 18 उपाध्यक्ष, 1 खजिनदार, 65 सरचिटणीस, 104 चिटणीस, 6 प्रवक्ते, 14 सदस्यीय कार्यकारी समिती, 7 वरिष्ठ सदस्यीय कार्यकारी समिती, 5 सदस्यीय शिस्तपालन समिती अशी एकूण 220 जणांची राज्यस्तरीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस खासदार के.सी.वेणूगोपाल यांनी या निवडी पत्राद्वारे जाहीर केल्या आहेत.

सर्व समावेशक अशी व सुमारे 48 जाती- जमातींना प्रतिनिधीत्व देत काँग्रेस ने सामाजिक समतोल साधला आहे. या कार्यकारिणीतील निवडीमुळे पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये विशेषत: पिपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेस पक्षाने जून्या व निष्ठावंताना न्याय दिल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

सचिन साठे यांनी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. तर, गौतम अरकडे हे काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे राज्य कार्याध्यक्ष या पदावर काम करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.