Pimpri News: पिंपरी कॅम्पमध्ये शिवजयंती उत्साहात 

एमपीसी न्यूज – पिंपरी कॅम्प येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त महिलांची उपस्थितीत लक्षणीय होती. छत्रपतींचा जयघोष करत पिंपरी कॅम्पमधील वातावरण शिवमय झाले.

शगुन चौक पिंपरी कँम्प येथे शिवसेना पिंपरी विधानसभा शहरसमन्वयक गणेश आहेर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.  यावेळी मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर, विष्णू साळवे, रोमी संधू, खंडू शिरसाठ, अनिल पारचा, बाळासाहेब गायकवाड, मारुती म्हस्के, लहु तिकोणे, संजय यादव, गोरख पाटील, दीपक कांबळे, भरत इंगळे, प्रदीप दळवी, अंकुश कोळेकर, तस्लीम शेख, शुभांगी कदम, दीपक भक्त, धनराजसिंग चौधरी, विशाल वाली, हरेश नखाते, एकनाथ मंजाळ, गणेश वायभट, विशाल बाविस्कर, दत्ता गिरी, सय्यद पटेल, अरुण पात्रे, रविकिरण घटकार, अमर कापसे, बाबा जगताप, राकेश नखाते, अमित आहेर, नारायण खुशलाणी, शंकर शिंगारे, राहुल कदम आदी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. चाबुकस्वार यांनी आपल्या मनोगतामध्ये पिंपरी कँम्प परिसरात सतत समाजोपयोगी कार्यक्रम घेणारे गणेश आहेर यांचे कौतुक केले. तसेच त्यांच्या कार्याची दखल शिवसेना घेत असल्याचेही सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.