Pune News : ईश्वरी फाऊंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा ‘नारीशक्ती’ पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत  ‘स्त्रीने स्त्रीसाठी स्त्रीकडून केलेला जागर’ या थीम अंतर्गत ईश्वरी फाऊंडेशन संचलित इलाईट किड्स शाळेने ज्या महिलांनी समाज रुढी , परंपरा झुगारून शिक्षण आणि स्वातंत्र्य याचा चांगला उपयोग करून आज उत्तुंग भरारी घेतली आहे अशा 10 महिलांना  ‘नारी शक्ती’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

ईश्वरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जागृती अभंग यांच्या हस्ते योगगुरू शैलजा मुळगुंद, समाजसेविका मधुरा भेलके,  मुख्याध्यापिका अजिता परबत , वास्तू विशारद गायत्री मंडलिक , ड्रायव्हिंग क्विन दिव्या दीक्षित, उद्योजिका अन्नपूर्णा जगताप, बालरोगतज्ञ सोनल पाटील , सी. ए. प्राची शाह, कोविड वारियर उर्मिला मोरे, समाज सेविका निशा पाटील यांना पुरस्कृत करण्यात आले.

महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमा अंतर्गत विविध खेळ, नृत्य आणि विविध कलांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच शाळेत राबवण्यात आलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण ही या वेळी करण्यात आले.  तसेच यावेळी लकी ड्रॉ मधून निवडलेल्या तीन महिलांना मधुलता पर्ल्स आणि ज्वेलर्स मोतीवाले याच्या प्रमुख रुपाली पिंगळे यांच्याकडून  पल्लवी गाडे यांना पैठणी, सविता शेटीया यांना एक ग्राम सोन्याचा दागिना आणि वृषाली लिम्हण यांना  दोन  सिनेमा तिकिटे देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती सरपाले आणि अश्विनी गाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इतर शिक्षिकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.