India Corona Update : धक्कादायक ! देशातील 56 टक्के सक्रिय रुग्ण एकट्या महाराष्ट्रात

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. एकट्या महाराष्ट्रात 50 ते 55 हजारांच्या आसपास दररोज रुग्ण वाढ होत आहे. यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 56 टक्के सक्रिय रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत.

गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 1 लाख 15 हजार 736 नव्या नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 28 लाख 01 हजार 785 एवढी झाली आहे.

त्यापैकी सध्या 8 लाख 43 हजार 473 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तब्बल 4 लाख 72 हजार 283 सक्रिय रुग्ण (56 टक्के) एकट्या महाराष्ट्रात आहेत.

देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 17 लाख 92 हजार 135 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 92.11 टक्के एवढा झाला आहे. तर, महाराष्ट्रातील 25 लाख 83 हजार 331 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, रिकव्हरी रेट 82.97 टक्के एवढा झाला आहे.

लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 8 कोटी 70 लाख 77 हजार 474 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.