Delhi News : कारमध्ये एकटे असाल तरी मास्क बंधनकारक : दिल्ली उच्च न्यायालय 

एमपीसी न्यूज – कार मधून एकटे प्रवास करत असाल तरी मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. तसेच, कारमध्ये एकटे असाल तरी ते सार्वजनिक ठिकाण आहे. असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज एक लाखाहून अधिक रुग्ण देशात सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर ठिक ठिकाणी कडक निर्बंध लादले गेले आहेत तर, काही ठिकाणी अंशतः लॉकडाऊन करण्यात आला आहे. कारमधून एकटं प्रवास करताना मास्क न घातल्यास दंड वसूल केला जात आहे. याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात चार याचिका दाखल करण्यात आला आहेत. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायलयाने निर्णय दिला आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, ‘कार मधून एकटे प्रवास करत असाल तरी मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. मास्क हे कोरोना विरोधात ‘सुरक्षा कवच’म्हणून काम करते. कारमध्ये एकटे असाल तरी ते सार्वजनिक ठिकाण आहे. असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 1 लाख 15 हजार 736 नव्या नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 630 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या 8 लाख 43 हजार 473 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.