Pimpri News : शहरातून तीन दुचाकी, एक ऑटोरिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातून तीन दुचाकी आणि ऑटोरिक्षा चोरीला गेल्या आहेत. चिखली, काळेवाडी, भोसरी आणि जुनी सांगवी परिसरात या चोरीच्या घटना घडल्या आहेत.

स्पाईनरोड, चिखली येथून 25 जानेवारी रोजी अक्षयकुमार चौरासिया (रा. तळेगाव दाभाडे ) यांची दुचाकी (MH 14 EX 8798) चोरीला गेली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश किसन थोरात (रा. काळेवाडी) यांची 15 हजार रुपयांची दुचाकी (MH 14 ET 7708) साईबाबा मंदिर, काळेवाडी येथून चोरीला गेली आहे. याबाबत थोरात यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सद्गुरू नगर, भोसरी येथून लिहाज अन्वर शेख यांची ॲटोरीक्षा (MH 12 QR 7861) चोरीला गेली आहे. याबाबत त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

योगेश दिगंबर शिंदे (रा. दापोडी) यांची दुचाकी (MH 12 AJ 0481) गंगानगर, जुनी सांगवी येथून चोरीला गेली आहे. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.