Pimpri News : वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रातील योगदान शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक : महापौर

एमपीसी न्यूज – हरित क्रांतीचे प्रणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात दिलेले योगदान शेती धोरणाला चालना देणारे, बळीराजाला अधिक प्रगत करण्याच्या दृष्टीने क्रांतीकारक ठरले असल्याचे प्रतिपादन महापौर उषा ढोरे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास उपमहापौर हिराबाई घुले, आयुक्त राजेश पाटील, प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, जनता संपर्क अधिकारी किरण गायवाड, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सिताराम राठोड, रवि राठोड, दिलीप आडे, रमेश राठोड, अविनाश राठोड आदी उपस्थित होते.

महापौर ढोरे म्हणाल्या, दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे सतत शेतक-यांच्या हितासाठी प्रयत्नशील असायचे, त्यांनी गरीबांसाठी रोजगार हमी योजना सुरु केली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन वसंतराव नाईक यांनी सार्वजनिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रात मिळवलेले यश सर्वांसाठी सतत प्रेरणादायक ठरेल. कृषी सिंचन क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी दिवंगत नाईक यांनी केलेली कृषी क्रांती महत्वपूर्ण आहे. राज्याच्या विकासाला दिशा देण्यासाठी त्यांनी केलेली पायाभरणी मार्गदर्शक ठरत आहे.

सूत्रसंचालन माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.