Pimpri News: अनियमित व अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेस गुरुवारी करणार आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात पवना धरणातून आणि काही भागात एमआयडीसीतून पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी पवना धरण शंभर टक्के भरले होते. शहरात चोवीस तास पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन प्रशासन आणि तत्कालीन पदाधिका-यांनी अनेकवेळा दिले होते. परंतु, अद्यापही शहरात अनियमित आणि अवेळी अपुरा पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप करत प्रशासनाच्या विरोधात महिला काँग्रेस गुरुवारी (दि.24) आंदोलन करणार आहे.

याबाबतची माहिती महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी जेष्ठ नेत्या निगार बारस्कर, डॉ. मनिषा गरुड, निर्मला खैरे, वैशाली शिंदे, सीमा हलकट्टी, रिटा फर्नांडिस आदी उपस्थित होते.

महिला काँग्रेसने शहरातील अनियमित, अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत 24 फेब्रुवारी 2022 रोजी आहे. महापालिका भवनावर जन आंदोलन करीत हंडा मोर्चा काढला होता. त्यावेळी आयुक्त राजेश पाटील यांनी पुढील पंधरा दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करु असे महिला आश्वासन दिले होते. पण, आयुक्त राजेश पाटील आणि त्यांच्या प्रशासनाने अद्यापही पाणी पुरवठ्याबाबत गांभिर्य दाखविलेले नाही. याचा निषेध म्हणून गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

मागील पाच वर्षात पवना बंद जलवाहिनी प्रकल्प जैसे थे आहे. भाजपाचे पदाधिकरी या प्रकल्पाविषयी शहरात एक बोलतात आणि मावळात दुसरेच बोलतात. नागरीकांची दिशाभूल करण्यात भाजपने पाच वर्षे घालवली. भामा – आसखेड – आंद्रा पाणी पुरवठा योजनेसाठी हजारो कोटींचा खर्च करुन अद्यापही प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत. भाजपाने त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेले पाणी पुरवठ्याचे एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. उलट प्रशासनाने मार्च एण्डिंगचे कारण सांगून नागरिकांचा पाणी पुरवठा खंडीत करण्यासाठी अनेक पथके नेमली आहेत आणि युध्द पातळीवर मिळकत कर वसुली तसेच पाणी पुरवठा तोडण्याचे काम सुरु आहे याचाही महिला काँग्रेस निषेध करत असल्याचे त्या म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.