Pimpri News: कोरोना काळातील कार्याबद्दल योगेश बहल यांचा ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट’ प्रमाणपत्र  देऊन गौरव

एमपीसी न्यूज – कोरोना संकटकाळात निरपेक्ष आणि प्रामाणिक सेवा करून असंख्य रुग्णांना या जीवघेण्या आजारापासून वाचविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे माजी महापौर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांच्या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. जागतिक पातळीवर काम करणाऱ्या लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने बहल यांचा ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट’ हे प्रमाणपत्र  देऊन गौरव करण्यात आला आहे.

संत तुकारामनगर येथे आयोजित कार्यक्रमात हे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह बहल यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब सय्यद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर कांबळे, शेरबहाद्दूर खत्री, ॲड. लक्ष्मण रानवडे, महेंद्र शर्मा, विरेंद्र बहल, देशभूषण दुड्डू, हरप्रीत सिंह उपस्थित होते.

योगेश बहल हे राजकीय व सामाजिक क्षेत्रात गेल्या 30 ते 35 वर्षांपासून कार्यरत आहेत. याबरोबरच ते ईश्वरदास बहल चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, या संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षांपासून विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, गेल्या दीड वर्षापासून करोनाविरोधात लढण्यासाठी या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले गेले. सर्वसामान्यांना तात्काळ आणि मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी केलेले मदतकार्य सर्वोत्तम ठरले. ईश्वरदास बहल चॅरिटेबल ट्रस्टने केलेल्या या कार्याची दखल घेत पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर योगेश बहल यांना लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट’ हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.