Pimpri News: ‘उद्योजक मीलन’तर्फे रविवारी एमएसएमई कार्यशाळेचे आयोजन

एमपीसी न्यूज: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उद्योजक मिलनातर्फे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग व्यवसायासंबंधी विविध योजना, त्याचे क्रियान्वयन व  होणारे फायदे या महत्वाच्या विषयावर कार्यशाळेचे आयोजन रविवार दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 11 दरम्यान चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात करण्यात आले आहे

विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने होणाऱ्या या कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून एम.एस. एम. ई. चे क्लस्टर विकास अधिकारी सहसंचालक अभय दफ्तरदार, ज्योती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे नित्यानंद थेवर, एम्.एस एम ई बोर्डचे केंद्रीय सदस्य प्रदीप पेशकर यांचेसह रा.स्व.संघाचे जिल्हा संघचालक तसेच जयश्री पॉलिमरचे विनोद बन्सल प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे उद्योजक मिलनाच्या माध्यमातून विविध स्तरावरील उद्योजकांचे एकत्रीकरण करण्यात येऊन उद्योग क्षेत्रातील प्रश्न तसेच नवनवीन संकल्पना याविषयावर विचार मंथन करण्यात येत असते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात, उद्योगांच्या भरभराटीतूनच राष्ट्रहित जोपासून हे समृध्द राष्ट्र बनू शकते ही देखील भावना आहे. सदर कार्यशाळेत आत्मनिर्भर भारत या महत्वाच्या विषयाच्या अनुषंगाने असलेल्या योजना, प्रोडक्शन लिंक्ड योजना, क्लस्टर योजना, कृषी उद्योग, डिजिटल पोर्टल, बँकिंग, महिला उद्योजकांसाठी असलेल्या योजना आदी विविध विषयांवर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यशाळा पूर्णतः निःशुल्क असून सहभागासाठी शहरातील उद्योजक https://live.24thmile.com/udyojak-milan-26dec लिंक किंवा  91 97304 45393 / 917350017207 वर नोंदणी करू शकतात. शहरातील विविध स्तरावरील उद्योजकांनी नोंदणी करून जास्तीत जास्त संख्येने या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.