Pimpri : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मुस्लीम बांधवाकडून मोफत पाणी वाटप

एमपीसी न्यूज – महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम ( Pimpri ) बांधवांच्या वतीने मानवंदना देत पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या त्यांच्या अनुयायींना मोफत बंद बाटलीतील मिनरल पाण्याचे वाटप कऱण्यात आले आहे.

हे वाटप सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक, पोलीस हवालदार पांडुरंग जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

Maharashtra : राज्यात अवकाळीचे सावट, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात यलो अलर्ट

यावेळी त्यांनी मुख्य संयोजक ख्वाजा हुसेन कुरेशी, यांचे विशेष कौतुक केले सुमारे पाच हजाराहून अधिक पिण्याच्या पाण्याचे बाटलीचे वाटप मुख्य संयोजक ख्वाजा हुसेन कुरेशी, बाबू कुरेशी, सतीश गोडेराव, महाराज तुकाराम सूर्यवंशी ,,गुलाम जिलानी, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलाम अली भालदार आदींनी पिण्याच्या पाण्याचे बंद बाटलीतील मिनरल पाण्याचे वाटप करण्यासाठी सहकार्य केले . अनुयायींनी या वेळी मुस्लिम बांधवांचे आभार ( Pimpri ) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.