Pimpri : सी ए इन्स्टिटयूटच्या पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्षपदी पंकज पाटनी यांची निवड

एमपीसी न्यूज – दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शाखा ( Pimpri ) अध्यक्ष पदी सी ए पंकज पाटनी यांची निवड करण्यात आली . निगडी येथील संस्थेच्या कार्यालयात नुकत्याच घेण्यात आलेल्या निवडणूकीत त्यांची निवड जाहीर करण्यात आली . मावळते अध्यक्ष सीए सचिन बन्सल यांच्याकडून  सी ए पंकज पाटनी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.

Moshi : महाराष्ट्र एमएसएमई संरक्षण प्रदर्शनला भारतीय वायुसेनेचे प्रमुख व्ही आर चौधरी यांनी दिली भेट

संस्थेचे नियुक्त केलेल्या अन्य पदाधिकारयांमध्ये सी ए वैभव मोदी – उपाध्यक्ष, सेक्रेटरी- सी ए सारिका चोरडीया , खजिनदार- सी ए शैलेश बोरे, अध्यक्ष विद्यार्थीसंघटना- सी ए सचिन धेरंगे, माजी अध्यक्ष सीए सचिन बन्सल , सी ए विजयकुमार बामने आणि यांचा समावेश आहे.

संस्थेच्या आवारात  सी ए मेंबर आणि  विद्यार्थ्यासाठी कार्य शाळा ,कर विषयक ज्ञान प्रसार, परिसंवाद,  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि इतर समाज उपयोगी उपक्रम वर्षभर राबविण्याचा संकल्प असल्याची माहिती अध्यक्ष पदी  पाटनी यांनी ( Pimpri ) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.