Pimpri: नाट्यगृहांमध्ये लिहिण्यासाठी ‘सुभाषित’ पाठविण्याचे पालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व नाट्यगृहे, प्रेक्षागृहांमध्ये स्टेजच्यावरील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत शहराचे सांस्कृतिक, औद्योगिक व ऐतिहासिक वैभव / महत्व प्रतिबिंबित करणारे छान असे मराठी दोन ओळीचे सुभाषित लिहिण्याचे नियोजित आहे. शहरवासियांनी सुभाषित पाठविण्याचे आवाहन सह शहर अभियंता प्रवीण तुपे यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेची नाट्यगृहे, प्रेक्षागृहे आहेत. यामध्ये शहराचे सांस्कृतिक, औद्योगिक व ऐतिहासिक वैभव / महत्व प्रतिबिंबित करणारे छान असे मराठी दोन ओळीचे सुभाषित लिहीण्याचे नियोजित आहे. सर्व क्षेत्रातील नागरिकांनी सुभाषित सुचवावे किंवा तयार करून पाठवावे. ज्यांच्या सुभाषिताची निवड होईल त्यांचा उचित गौरव महापालिकेतर्फे करण्यात येईल.

ही सुभाषिते [email protected] ह्या ई मेलवर किंवा पालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावरील सह शहर अभियंता प्रवीण तुपे यांच्या विभागाकडे 20 ऑगस्ट 2018 पर्यंत लिखित स्वरुपात सादर करु शकतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.