Pimpri: ‘पीसीएनटीडीए’चे सीईओ सतीशकुमार खडके यांची बदली; प्रमोद यादव नवे ‘सीईओ’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए)चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)सतिशकुमार खडके यांची आज (बुधवारी)बदली झाली आहे. त्यांच्या जागी कोल्हापूर विभागाच्या जात पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रमोद यादव यांची वर्णी लागली आहे.

नियोजनबध्द व सर्वांगीण विकास करणे व विकसित झालेले जमिनीचे भूखंड गरजेनुसार निवासी, शैक्षणिक, औद्योगिक,वाणिज्य व सामाजिक कारणांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची 14 मार्च 1972 मध्ये स्थापना झालेली आहे.

  • प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी 8 नोव्हेंबर 2016 रोजी खडके यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी सव्वा दोन वर्षांच्या कार्यकाळात चांगले काम करण्यावर भर दिला.

राज्य सरकारच्या नगरसविका विभागाने खडके यांची आज बदली केली. त्यांच्या जागी कोल्हापूर विभागाच्या जात पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रमोद यादव यांची वर्णी लागली आहे. खडके यांना नियुक्तीच्या प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.