Pimpri Crime News : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ; पतीसह सासू आणि नणंदेवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – माहेरहून पैसे आणण्याची मागणी तसेच चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. याबाबत पती, सासू आणि नणंदेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 जुलै 2019 ते 24 मार्च 2021 या कालावधीत शिवणे, पुणे येथे घडला आहे.

पती प्रफुल्ल भिकाजी प्रताप (वय 30), सासू आणि नणंद (सर्व रा. शिवणे, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 29 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. नवीन फ्लॅट घेण्यासाठी चुलत्याकडून पाच लाख रुपये आणण्याची विवाहितेकडे मागणी केली. पैसे दिले नाही म्हणून आरोपींनी विवाहितेला मानसिक त्रास दिला. सतत टोमणे मारून बोलून विवाहितेला मध्यरात्री घराबाहेर काढले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.